Site icon samajsanchar.com

अलंकापुरी इंद्रायणी नदीत अजितदादा पवार यांच्या अस्थींचे विसर्जन

Spread the love

शोकाकुल वातावरणात अस्थिकलश मिरवणूक
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष, पुणे जिल्हा पालक मंत्री स्व. श्री अजितदादा पवार यांच्या अस्थि कलश रथ मिरवणूक आळंदीतून हरिनाम गजरात काढण्यात आली.
या प्रसंगी माजी आमदार विलास लांडे, कृष्णा खोरे विकास महामंडळ संचालक डॉ. राम गावडे, देवस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, आळंदीचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, उदयोजक सुधीर मुंगसे, प्रदेश प्रतिनिधी डी.डी. भोसले पाटील, गटनेते सचिन गिलबिले, विरोधी पक्ष गटनेते आदित्य घुंडरे, नगरसेवक दिनेश घुले, हेमंत कुऱ्हाडे पाटील, सुरेश झोंबाडे, माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे पाटील, मंगला वेळकर, बाबासाहेब ठाकूर, उत्तम गोगावले, शाम कोलन, माउली कुऱ्हाडे, महेश गोरे, संकेत वाघमारे, विमल ठाकूर, संदीप नाईकरे, किरण येळवंडे, सर्व पक्षीय पदाधिकारी, स्थानिक नागरिक, सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी स्व. श्री अजितदादा पवार यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. वडगाव चौक ते इंद्रायणी नदी घाट या दरम्यान मिरवणूक झाली. इंद्रायणी नदी घाटावर पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अभिवादन सभेत शोकाकुल वातावरणात श्रद्धांजली अर्पण केली. दरम्यान अस्थिकलश दर्शनास नदी घाटावर भाविक, नागरिकांनी गर्दी केली. यावेळी अस्थिकलश पूजन करण्यात आले. त्या नंतर अस्थी कलश विधिवत धार्मिक परंपरांचे पालन करीत इंद्रायणी नदीत विसर्जन करण्यात आला. या वेळी सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते, आळंदी ग्रामस्थ, वारकरी यांची उपस्थितीत हरिनाम गजरात अस्थींचे विसर्जन इंद्रायणी नदीत करण्यात आले. या प्रसंगी अजितदादा पवार अमर रहे, एकच वादा अजित दादा अशा घोषणा देण्यात आल्या. तत्पूर्वी अभिवादन, प्रतिमा पुष्पहार अर्पण करण्यात आला. अभिवादन सभेत मान्यवरांनी अभिवादन सभेत आदरांजली वाहिली. पसायदानाने अस्थी कलश विसर्जन मिरवणुकीची सांगता झाली. सर्व पक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version