Site icon samajsanchar.com

पुण्यात ‘किया वाइब स्टुडिओ’ची धमाल;   युवा क्रिएटर्ससाठी अनोखा अनुभव

Spread the love

पुणे, १५ मे २०२६ : किया इंडिया या देशातील आघाडीच्या मास-प्रीमियम वाहन निर्मात्याने हायब इंडियासोबतच्या भागीदारीतून पुण्यात ‘किया वाइब स्टुडिओ’ हा अनोखा उपक्रम सादर केला आहे. युवा पिढीच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

हा ‘हायब इंडिया पाँप अप पार्क’ १६ ते १७ मे दरम्यान फिनिक्स मार्केटसिटी येथील लिबर्टी स्क्वेअरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. संध्याकाळी ४ वाजल्यापासून सुरू होणाऱ्या या कार्यक्रमात संगीत, फॅन्डम आणि विविध इंटरॅक्टिव्ह अनुभवांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. सहभागींसाठी लाइव्ह परफॉर्मन्स, अॅक्टिव्हिटी झोन्स आणि खास क्युरेटेड अनुभवांची मेजवानी असणार आहे.

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘किया वाइब स्टुडिओ’, जो ‘किया एंगेजमेंट झोन’मध्ये उभारण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा स्टुडिओ किया सायरोस २०२६  या गाडीतच तयार करण्यात आला असून, येथे येणाऱ्या तरुणांना स्वतःचे व्हिडिओ तयार करून त्वरित शेअर करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे ही कार केवळ प्रवासाचे साधन न राहता सर्जनशीलतेचे व्यासपीठ बनत आहे.

नवीन २०२६ किया सायरोस ही अधिक आकर्षक एसयूव्ही डिझाइन, विविध व्हेरिएंट्स आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन (डिझेल एटीसह) पर्यायांसह सादर करण्यात आली आहे. यामध्ये प्रशस्त इंटिरियर्स, पाच-स्टार BNCAP सुरक्षा आणि अत्याधुनिक फीचर्सचा समावेश आहे, ज्यामुळे ही गाडी आधुनिक ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करते.

या पॉप-अप पार्कनंतर १७ मे रोजी Novotel Pune Nagar Road येथे HYBE INDIA कडून ऑन-ग्राउंड ऑडिशन्सही घेतले जाणार आहेत. या माध्यमातून भारतातील पुढील ग्लोबल गर्ल ग्रुपसाठी नवोदित प्रतिभांना संधी दिली जाणार आहे.

गुवाहाटी आणि मुंबईनंतर पुण्यातील हा कार्यक्रम ‘HYBE INDIA’च्या १० शहरांच्या दौऱ्याचा एक भाग असून, देशभरातील तरुण प्रतिभांना जागतिक मंच मिळवून देण्याचा हा प्रयत्न आहे. या उपक्रमातून किया इंडिया युवा पिढीशी अधिक घट्ट नाते जोडत असून, मोबिलिटीपलीकडे जाऊन संस्कृती आणि सर्जनशीलतेशी संवाद साधत आहे.

Exit mobile version