Site icon samajsanchar.com

१५ ऑगस्ट स्वतंत्रदिना निमित्त ८०० जैन मुलं मुलींनी केले सामूहिक सामायिक जाप साधना 

Spread the love

१५ ऑगस्ट ८० व्या स्वतंत्रदिना निमित्त पुण्यातील जैनांचे प्राचीन मंदिर गुरुवार पेठ स्थित श्री गोडीजी पार्श्वनाथ मंदिर येथे सुमारे ८०० हुन अधिक जैन मुला मुलींनी ४८ मिनिटांचे ” सामूहिक सामायिक जाप ” जैन गुरु आचार्य यशोविजयजी महाराज यांच्या उपस्थितीत करण्यात आले. शुद्ध वस्त्रात धारण करत सामायिक जाप, साधना या उपस्थित मुलांनी केले. या सामायिक जाप द्वारे धार्मिक गुणांचा विकास होतो आणि हातून अज्ञानात होणारे नवीन पाप थांबविले जाते.आपल्या हातून रोज होत असलेल्या अनेक पापांतुन या सामायिक जाप द्वारे क्षमा आणि मुक्तता होत असते. या प्रसंगी गुरु भगवंतांनी ८० व्या स्वतंत्र दिनाचे औचित्य साधत या मुलांना भारताचा अनेक स्वतंत्र वीरांचा आपल्या भारतासाठी दिलेल्या बलिदानाचा इतिहास उजागर केला. विशेष करून शहीद भगत सिंग यांनी कसे आपल्या भारत देशासाठी आपले बलिदान दिले यांची माहिती दिली. नवकार फ्रेंड्स सर्कल तर्फे या
महा सामूहिक सामायिक जाप चे आयोजन करण्यात आले.
( Exclusive Pictures by Sushil Rathod )

Exit mobile version