नेक्साँन, हॅरियरला ग्राहकांची पसंती
मुंबई, 1 नोव्हेंबर 2025: टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेडची देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील ऑक्टोबर २०२५ मधील एकूण विक्री ६१,२९५ युनिट्स इतकी झाली तर गेल्या वर्षी ऑक्टोबर २०२४ मध्ये हा आकडा 48,423 युनिट्स होता.
टाटा मोटर्सच्या पॅसेंजर्स व्हेईकल्स विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने या महिन्यात ६१ हजार २९५ यूनिट्सची विक्री केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात २७ टक्क्यांची वाढ झाली आहे. यात कंपनीच्या एसयूव्ही सेगमेंटने मजबूत नेतृत्व केले आहे. कंपनीने या कालावधीत एसयूव्हीच्या ४७ हजार गाड्यांची विक्री केली असून हा आत्तापर्यंतचा सर्वाधिक वाटा ७७ टक्के आहे. तर एकूण इलेक्ट्रिक वाहनांची विक्री मागील महिन्यात ९,२८६ युनिट्स इतकी झाली असून, ती ऑक्टोबर २०२४ मधील ५,३५५ युनिट्स विक्रीच्या तुलनेत ७३.४ टक्के वाढ झाली. आहे. कंपनीच्या नेक्साँन, हॅरियर आणि सफारीला सर्वाधिक मागणी होती. विविध मॉडेल्स आणि पॉवरट्रेन पर्यायांसाठी वाढती मागणी यामुळे ग्राहकांनी या गाड्यांना अधिक पसंती दर्शवली आहे. नवरात्री ते दिवाळी या काळात १ लाखाहून अधिक वाहनांची डिलिव्हरी केली असूवन ही वार्षिक वाढ ३३% पेक्षा जास्त आहे. यामध्ये टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेडची सहाय्यक कंपनी टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड यांच्या विक्रीचा समावेश आहे.
बिझनेस युनिट्स / सेगमेंट्सचे कामगिरी तपशील
| सेगमेंट | ऑक्टोबर ‘25 | ऑक्टोबर ‘24 | वाढ/घट |
| पॅसेंजर व्हेइकल्स देशांतर्गत (EV सह) | 61,134 | 48,131 | 27.0% |
| PV आंतरराष्ट्रीय व्यापार (IB) | 161 | 292 | -44.9% |
| एकूण PV (EV सह) | 61,295 | 48,423 | 26.6% |
| ईव्ही IB + देशांतर्गत विक्री | 9,286 | 5,355 | 73.4% |


