ब्रेमेन चौक येथे उड्डाणपूल प्रकल्पासाठी तज्ज्ञ सल्लागार नियुक्तीची मागणी
नगरसेवक सनी निम्हण यांची मागणी पुणे : पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक तथा राज्य सुधारित युवा धोरण समिती सदस्य सनी विनायक…

नगरसेवक सनी निम्हण यांची मागणी पुणे : पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक तथा राज्य सुधारित युवा धोरण समिती सदस्य सनी विनायक…
पुणे : भारताची राष्ट्रीय प्रसारण सेवा असलेल्या आकाशवाणी (ऑल इंडिया रेडिओ) ने आपल्या स्थापनेची ९० वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने देशभरातील…
पुणे, : पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगर क्षेत्रातील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर रेडीमिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्पांबाबत प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले…
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा अर्थात दहावी परीक्षेचा निकाल…
पिंपरी/ पुणे – डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे (अभिमत विद्यापीठ) येथे 17 वा पदवीप्रदान समारंभ शनिवारी, दि. 9 मे 2026 रोजी दुपारी 3:30 वाजता विद्यापीठाच्या सभागृहात संपन्न होणार आहे. या समारंभासाठी मा. श्री. ज्योतिरादित्य एम….
पुणे,दि. ७ मे, २०२६:- केंद्र सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना’ घराघरांत पोहोचवण्यासाठी महावितरणच्या पुणे परिमंडलाने कंबर कसली आहे. शुक्रवारी रास्ता पेठ शहर मंडल, गणेशखिंड शहर मंडल आणि पुणे ग्रामीण मंडलातील सर्व उपविभाग व शाखा कार्यालयांतर्गत महावितरणचे वीज कर्मचारी थेट गृहनिर्माण संस्थांमध्ये जाऊन या योजनेचा प्रसार करणार आहेत. पुणे परिमंडलात आतापर्यंत ३४३१२ ग्राहकांनी सूर्यघर योजनेचा लाभ घेतला आहे. त्याची क्षमता १७० मेगावॉट इतकी असून सूर्यघर योजनेमुळे या ग्राहकांचे वीजबिल शून्यवत झाले आहे. केंद्र सरकार सूर्यघर योजनेसाठी १ किलोवॅट प्रकल्पाला ३०,००० रुपये, २ किलोवॅट प्रकल्पासाठी ६०,००० रुपये तर ३ किलोवॅट किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी कमाल ७८,००० रुपये इतके अनुदान देत आहे. एका किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पातून दरमहा सरासरी १२० युनिट वीज तयार होते. सूर्यघर प्रकल्पासाठी राष्ट्रीयकृत बँकांकडून ९० टक्क्यांपर्यंत कर्ज सुद्धा मिळते. चौकट : प्रधानमंत्री-सूर्यघर योजनेला वीजग्राहकांपर्यत पोहोचविण्यासाठी वीज कर्मचारी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जाऊन माहिती पत्रके वाटतील आणि ग्राहकांना मिळणाऱ्या भरघोस अनुदानाची माहिती देऊन योजनेत सहभागी होण्याचे आवाहन करतील. सुनिल काकडे, मुख्य अभियंता, महावितरण, पुणे
पुणे, दि. ७ : केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (पीएमआयएस) २०२६‘ अंतर्गत देशामध्ये ३१ हजार ४८० हून जागेवर विविध नामांकित…
विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी तंत्रज्ञानाधारित उद्योगांची गरज पद्मश्री मिलिंद कांबळे यांचे प्रतिपादन; भारतातील पहिल्या तीन दिवसीय ‘ईआरपी प्रदर्शना’चे उद्घाटन पुणे/पिंपरी, ता….
कबड्डी, कुस्ती, खो-खो व बास्केटबॉलच्या स्पर्धेसाठी ४१ संघ सहभागी होणार पुणे, दि. ४ मे २०२६: अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियामक मंडळाच्या ४७ व्या राष्ट्रीय कबड्डी, कुस्ती, खो-खो व बास्केटबॉलच्या क्रीडास्पर्धेचे आयोजन बुधवार (दि. ६) ते शुक्रवारपर्यंत (दि. ८) बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये करण्यात आले आहे. या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये १० राज्यांतील विविध विद्युत कंपन्यांचे पुरुष व महिला गटातील तब्बल ४१ संघ सहभागी होत आहेत. या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रासह गुजरात, हरियाणा, तेलंगाणा, राजस्थान, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, दिल्ली आदी राज्यांतील सरकारी व खासगी विद्युत कंपन्यांचे ४१ संघ आणि सुमारे ५३८ महिला व पुरुष खेळाडू सहभागी होत आहेत. कबड्डी, कुस्ती, खो-खो व बास्केटबॉलमध्ये पुरुष संघात लढत होईल तर कबड्डी व खो-खोमध्ये महिला संघांचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्पर्धेतील अजिंक्यपदासाठी कबड्डीमध्ये पुरुष व महिला गटातील १८ संघ तर खो-खोसाठी ९ संघ सहभागी होत आहेत. तसेच कुस्ती व बास्केटबॉलमध्ये अजिंक्यपदासाठी पुरुष गटामध्ये प्रत्येकी ७ संघांमध्ये लढत होणार आहे. विद्युत क्रीडा नियामक मंडळाच्या या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी (दि. ६) सकाळी ९.३० वाजता राज्याच्या ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांच्या मुख्य उपस्थितीत महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्याहस्ते होणार आहे. यावेळी राज्याच्या क्रीडा आयुक्त सौ. शीतल तेली-उगले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. तसेच महावितरण, महानिर्मीती, महापारेषण कंपनीच्या संचालक मंडळासह अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. जिग्नेश राय, सरचिटणीस श्री. नरेश कुमार यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तर शुक्रवारी (दि. ८) सायंकाळी ५ वाजता अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीवकुमार (महापारेषण) व श्री. राधाकृष्णन बी. (महानिर्मिती) यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षिस वितरणाचा कार्यक्रम होईल. महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनात या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजन समितीचे अध्यक्ष म्हणून पुणे प्रादेशिक संचालक श्री. सुनील काकडे तसेच उपाध्यक्ष म्हणून मुख्य अभियंता श्री. अनिल कोलप (महापारेषण) व अधीक्षक अभियंता श्री. अशोक घाडगे (महानिर्मिती) आणि मुख्य समन्वयक म्हणून मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. संजय ढोके (महावितरण) व श्री. पुरुषोत्तम वारजुरकर (महानिर्मिती) आणि विविध समितीचे प्रमुख व सदस्य कार्यरत आहेत.
कुटुंबातील ज्येष्ठांना वृद्धाश्रमात धाडणे हे कोणत्याही सुसंस्कृत शहराला शोभणारे नाही – संदीप खर्डेकर. क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे विविध संस्थांना मदतीचा हात…