आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात अक्षय तृतीया निमित्त श्रींचे संजीवन समाधीवर श्री भगवान पांडुरंगरायांचा अवतार साकारण्यात आले. लक्षवेधी चंदन उटी पुण्यातील मूर्तिकार अभिजित धोंडफळे आणि सहकारी यांनी परिश्रम पूर्वक साकारली. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, स्वकाम सेवा मंडळ आळंदी यांच्या वतीने ही चंदन उटी सेवा उत्साहात रुजू झाली. अशी माहिती व्यवस्थापक माऊली वीर यांनी दिली. भाविकांनी आळंदी पंचक्रोशी तील मंदिरांत चंदनउटी पाहण्यासह श्रींचे दर्शनास गर्दी केली होती.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात प्रथा परंपरांचे पालन करीत चैत्र महिन्यात श्रीनां चंदन उटी लावण्यात येते. माऊलींचे संजीवन समाधीवर चंदन उटीतून श्रींचे वैभवी श्री विठ्ठल रूप साकारण्यात आले. श्रींचे वैभवी रूप दर्शनासह चैत्र गौरी पूजनास महिलांसह भाविकांनी श्रींचे दर्शनास गर्दी केली. माऊली मंदिरात तसेच आळंदीतील विविध मंदिरांत दर्शनास गर्दी झाली होती. श्रींचे उटीसह गाभा-यात मोगरा फुलांची लक्षवेधी सजावट तसेच माऊलींचे संजीवन समाधी समीप श्रीचे श्री ज्ञानेश्वरी सह प्रतिकृती चंदन उटी पाहण्यासह भाविकांची गर्दी झाली होती. स्वकाम सेवा कार्यकारी मंडळाचे वतीने भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले.
अक्षय तृतीये निमित्त आळंदी देवस्थान आणि स्वकाम सेवा मंडळाचे वतीने अध्यक्ष सुनील तापकीर, महिला अध्यक्षा आशा तापकीर आणि सर्व स्वकाम सेवक साधकांनी उटीचे लक्षवेधी नियोजन करीत चंदन उटी सेवा रुजू केली. मंदिरात चैत्र गौरी पूजन, चंदन उटी दर्शन उत्साहात झाले. महिला भाविकांनी कारंजा मंडपात गर्दी करून श्रींचे दर्शन घेत हळदी-कुंकू घेतले. आळंदी मंदिरातील कारंजा मंडपात चैत्र गौरी पूजना निमित आकर्षक सजावट करण्यात आली होती. चैत्र गौरीचे वैभवी रूप पाहण्यासह दर्शनास महिला, भाविक, नागरिकांनी गर्दी केली.
श्रीचे गाभाऱ्यात अक्षय तृतीये निमित्त संजीवन समाधीवर चंदन उटीतुन माऊलींचे श्री विठ्ठल रूप परिश्रम पूर्वक साकारण्यात आले. विविध वस्त्रालंकारांनी सजलेले श्रींचे रूप दर्शनास भाविकांनी गर्दी केली. आळंदी परिसरात साडेतीन मुहूर्ता पैकी एक असणारा अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधत विविध नवीन उपक्रम आणि वाहन खरेदी निमित्त वाहनाची मंदिरा बाहेर पूजा मोठ्या उत्साहात करण्यात आली.
माऊली मंदिरातील प्रथा परंपरांचे पालन करीत अक्षय तृतीये निमित्त प्रथम घंटानाद, काकडा, श्रींना पवमान अभिषेक, दुधारती, पूजा आणि भाविकांचे दर्शन तसेच महिलांचा हळदी-कुंकू असे कार्यक्रम उत्साहात झाले.
अक्षय तृतीया दिनी आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त भावार्थ देखणे, विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, विश्वस्त चैतन्य महाराज कबीरबुवा लोंढे, पुरुषोत्तम महाराज पाटील, राजेंद्र उमाप, रोहिणी पवार, व्यवस्थापक माउली वीर, उप व्यवस्थापक तुकाराम माने, श्रीधर सरनाईक यांचे मार्गदर्शन आणि नियंत्रणात विविध उपक्रम आणि धार्मिक कार्यक्रम मंदिरातील प्रथा परंपरांचे पालन करीत झाले. श्रींचे दर्शन घेत भाविकांनी मंदिरातील चंदन उटी पाहत नेत्रांत श्रींचे रुप साठविले. या प्रसंगी मुख्य व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, तुकाराम माने, श्रीधर सरनाईक,संजय रणदिवे, श्रीकांत लवांडे, ज्ञानेश्वर पोंदे आणि सेवक यांनी देवस्थानच्या प्रथा प्रमाणे धार्मिक महत्व ओळखून भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था ठेवली. महेश गोखले आदींनी मंदिरातील व्यवस्थापन आणि दैनंदिन कामकाज पाहिले. भाविकांचे दर्शनाचे सुलभ नियोजन केले. भाविकांनी दर्शन व आरती साठी गर्दी करून दर्शन घेतले.
अक्षय तृतीया दिनी तक्षशिला बुद्ध विहार आळंदी येथे आळंदी संविधान जागर अभियान अंतर्गत संविधान जनजागृती प्रकारचे वाटप अभियान प्रमुख अर्जुन मेदनकर यांचे हस्ते करण्यात आले.
आळंदी मंदिरात अक्षय तृतीया दिनी श्रींचे विठ्ठल रूप चंदनउटी श्रींचे वैभवी रूपदर्शनास माऊली भक्तांची गर्दी


