अधिक मास निमित्त थोरल्या पादुका मंदिरात भागवत कथेचे आयोजन

Spread the love

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : पुणे आळंदी रस्त्यावरील वडमुखवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका देवस्थान ट्रस्ट चे वतीने ह.भ.प. आदिनाथ महाराज फपाळ यांच्या सुश्राव्य मंत्रमुग्ध करणाऱ्या वाणीतील श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळ्याचे आयोजन रविवार ३१ मे ते ७ जून २०२६ या कालावधीत हरिनाम गजरात होणार आहे. अशी माहिती श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका देवस्थान ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष ॲड विष्णू तापकीर यांनी दिली आहे. पुरुषोत्तम मास हा नाम चिंतन, श्रवण, भजन, कीर्तन या साठी पर्वणी आहे. यात मंदिरात काकडा, हरिपाठ, महिला भजने, हरी जागर असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. दुपारी दोन ते पाच या वेळेत श्रीमद् भागवत कथा आदिनाथ महाराज फपाळ यांची श्रवणीय कथा होणार आहे. भाविक, नागरिकांनी या धार्मिक पर्वणीत उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. तापकीर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *