कुशाल सिंग, अरलँड स्टॅलियन यांचे प्रत्येकी दहा गोल
पुणे, माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या फिट इंडिया संकल्पनेतून केंद्रीय राज्यमंत्री मा. मुरलीधर मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार क्रीडा महोत्सवानिमित्त आयोजित खासदार करंडक खुल्या 6-अ-साइड फुटबॉल स्पर्धेत साखळी फेरीत खुल्या गटात अवघ्या 30मिनिटांच्या सामन्यात कुशाल सिंग(1,3,6,7,8,10,14,15,17, 20मि.), अरलँड स्टॅलियन(2,4,5,9,13,16,19, 21,23, 24, मि.) यांनी नोंदवलेल्या प्रत्येकी दहा गोलाच्या जोरावर टीम विनीत अ संघाने अल्फा युनायटेड संघाचा 26-0 अशा फरकाने पराभव करून विक्रमी विजयाची नोंद केली.
भांडारकर रोड येथील ग्रीन बॉक्स रिक्रीएशन फुटबॉल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत खुल्या गटात दुसऱ्या लढतीत देखील टीम विनीत अ संघाने रोअरिंग रायडर्स संघाचा 6-2 असा पराभव केला.
अन्य लढतीत टायटन्स संघाने मायटी स्टॉर्मस एफसी संघावर 4-1 असा विजय मिळवला. विजयी संघाकडून यश भिडे(3मि.), श्रीरंग भावे(4मि.), निहार आपटे(10मि.), रोहित गोळे(16मि.) यांनी प्रत्येकी एक एक गोल केला. दुसऱ्या लढतीत टायटन्स संघाने स्टॅलियन्स पुणे एफसी संघाचा 5-3 असा पराभव केला.
12 वर्षाखालील गटात साखळी फेरीत जस्ट स्पोर्टस अकादमी, स्पोर्टस एरेना एफए, व्हिक्टोरिया स्पोर्टस, इग्नाईट एफए या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव आगेकूच केली.
निकाल: साखळी फेरी: खुला गट
टीम विनीत अ: 6(कुशाल सिंग 5,18, 20मि., अरलँड स्टॅलियन 16मि. मिका शेख 22मि. अथर्व खडतरे 30मि.) वि.वि. रोअरिंग रायडर्स: 2(आर्यन भोईटे 1मि , रोहित विभुते 3मि.)
स्टॅलियन्स पुणे एफसी: 1(सत्यम धनतुळे 12मि.) बरोबरी वि. मायटी स्टॉर्म्स एफसी: 1(अहान सिद्दिकी 15मि.);
टीम विनीत अ: 26(कुशाल सिंग 1,3,6,7,8,10,14,15,17, 20मि., अरलँड स्टॅलियन 2,4,5,9,13,16,19, 21,23, 24, मि., मिका शेख 12,18,25,26,27, 30मि.) वि.वि.अल्फा युनायटेड: 0;
टायटन्स: 4(यश भिडे 3मि., श्रीरंग भावे 4मि., निहार आपटे 10मि., रोहित गोळे 16मि.)वि.वि.मायटी स्टॉर्म्स एफसी: 1(विशाल अय्यर 12मि.);
रोअरिंग रायडर्स: 5(आर्यन भोईटे 2, 9मि., रेहान शेख 12मि., पीयुष महतो 25मि., प्रणव गुप्ता 23मि.) वि.वि.अल्फा युनायटेड: 0;
टायटन्स: 5(यश भिडे 2, 5मि., श्रीरंग भावे 6मि., निहार आपटे 16मि., आदित्य शितोळे 20मि.)वि.वि.स्टॅलियन्स पुणे एफसी: 3(हुजेफा शेख 7, 19मि., सत्यम धनतुळे 26मि.);
एनएसएफसी इलेव्हन: 4(साहिल अहमद 3, 9मि., उमर खान 15मि., पॉल फलेरो 16मि.) वि.वि.वन लाइफ एफसी: 1(हर्ष 12मि.);
12 वर्षाखालील गट:
जस्ट स्पोर्टस अकादमी: 4(विहान जोशी 2, 5मि., अर्णव कारेकर 12मि., अद्वैय पुरंदरे 15मि.) वि.वि.इग्नाईट एफए: :0;
स्पोर्टस एरेना एफए: 6(आर्यनेत रावळ 1,6, 18मि., रियांश बिलोरी 5, 10मि., युग जयरा 16मि.) वि.वि.व्हिक्टोरिया स्पोर्टस: 0;
व्हिक्टोरिया स्पोर्टस: 7(जयनम जैन 2,4,10,15मि., लक्ष बनसले 16, 19मि., अनय केळकर 25मि.) वि.वि.जायंटस: 0;
इग्नाईट एफए: 8(किरण सूर्यवंशी 2, 4मि., आण्विक लोबो 5, 10मि., स्टीव्ह सेल्वराज 11मि., अयान मुथा 12मि., अयान सोनीगुवा 16मि., विवान शेणय 20मि.)वि.वि.मायटी स्टॉर्म्स एफसी: 0;
स्पोर्टस एरेना एफए: 7(अरण झेंडे 3,4, 16मि., नमिष व्यास 12मि., अर्णव पांडा 13मि., केदार जाधव 16मि., रेयांश बिलोरी 22मि.)वि.वि.जायंटस: 0


