मुंबई, डिसेंबर २५, २०२५: गोदरेज एंटरप्राइझेस ग्रुपने १२ डिसेंबर ते १४ डिसेंबर २०२५ पर्यंत आयोजित करण्यात आलेला प्रमुख डिझाइन व शाश्वतता प्लॅटफॉर्म कॉन्शिअस कलेक्टिव्हच्या तिसऱ्या पर्वाचे यशस्वीपणे समापन केले. थीम ‘रिक्लेमिंग कूल: बीटिाग द हीट टूगेदर‘सह या तीन-दिवसीय इव्हेण्टमध्ये जागरूक पर्यायांना आकार देण्यामध्ये आणि हवामान-अनुकूल राहणीमान प्रगत करण्यामध्ये कॉन्शिअस कलेक्टिव्हचा वाढता प्रभाव दिसून आला.
मुंबईतील पूर्वीची फॅक्टरी इंटीरिओ बाय गोदरेज येथे आयोजित करण्यात आलेल्या या इव्हेण्टमध्ये १८,००० हून अधिक अतिथींनी उपस्थिती दाखवली, ज्यामध्ये भारतातील व जगभरातील आर्किटेक्ट्स, डिझाइनर्स, धोरणकर्ते, विद्यार्थी, क्रिएटर्स, कुटुंबं, शाश्वततेचे समर्थक आणि उद्योजकांचा समावेश होता. यंदा, सेलिब्रिटी करिना कपूर यांनी देखील प्लॅटफॉर्मला भेट दिली, धोरणकर्त्यांसोबत चर्चा केली आणि अधिक जागरूक भविष्याबाबत संदेशाचा प्रसार केला.
गेल्या ३ वर्षांमध्ये प्लॅटफॉर्ममध्ये १५० सहयोगी व ५० स्टार्टअप्सनी सहभाग घेतला, ज्यामधून भारतात शाश्वत नाविन्यता आणि जबाबदार उद्योजकतेप्रती प्रबळ गती दिसून येते. डब्ल्यूआरआय, सीईईडब्ल्यू यांसारख्या आघाडीच्या धोरण संस्थांच्या, तसेच महाराष्ट्र सरकार व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थांचे प्रतिनिधी, फायनान्शियर्स आणि गुंतवणूकदारांच्या सहभागासह कॉन्शिअस कलेक्टिव्ह हवामान समानता व हवामान कृतीसाठी प्रबळ स्रोत ठरले. स्टार्ट-अप्सना हरित फायनान्शियर्स व गुंतवणूकदारांसह पीक सस्टेनेबिलिटी व्हेन्चर्स, जस्ट क्लायमेट, आरती इंडस्ट्रीज आणि गोदरेज एंटरप्राइझेस ग्रुपकडून प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळाले. तसेच, निवडक उद्यमांना त्यांचा प्रभाव वाढवण्यासाठी वर्षभर मार्गदर्शन देखील मिळाले.
व्होल्व्हो कार्स इंडियाचे पाठबळ असलेल्या इकोप्रीन्युअर अवॉर्ड्ससह कॉन्शिअस कलेक्टिव्ह २०२५ ची सांगता झाली, जेथे शाश्वतता-केंद्रित नाविन्यतेला प्रशंसित करण्यात आले. डॉ. हर्ष सेठी, डॉ. अंशू दांडिया व डॉ. तनुज्जल बोरा यांनी स्थापना केलेली ट्रायनॅनो टेक्नॉलॉजीज थीम ‘रिक्लेमिंग कूल’शी संलग्न उल्लेखनीय कामगिरीसाठी विजेती ठरली.
आर्किटेक्चर व डिझाइन समुदायाने हवामान-अनुकूल भविष्यांवरील चर्चासत्राचे नेतृत्व केले, जेथे विचारवंत जसे आर्थर मामू-मणी, सोनाली रस्तोनी (मोर्फोजेनेसिस), डायना केलॉग, अयाज बसराई, नुरू करिम व समिरा राठोड यांनी शहरे, साहित्य व मानव-केंद्रित डिझाइनला नवीन रूप देण्याबाबत माहिती सांगितली. गोदरेज एंटरप्राइझेस ग्रुपचा भाग जीडीएल आपल्या पायाभूत सुविधा व इंटीरिअर्स व्यवसायाशी संलग्न नाविन्यता प्रयत्नांचा भाग म्हणून सर्वोत्तम प्रकल्प व फेलोशिप्सच्या माध्यमातून वर्षभर डिझाइन समुदायाशी संलग्न होतो.
जागरूकतेला आकार देण्यामध्ये संस्कृतीची भूमिका निदर्शनास आणत इव्हेण्टमधून सर्वोत्तम कलात्मक अनुभव मिळाला. मेधा साही यांच्याद्वारे आयोजित करण्यात आलेल्या स्ट्रेंजर्स क्वॉयरमध्ये २५० हून अधिक सहभागी दिसण्यात आले, ज्यामुळे त्यांनी नेतृत्व केलेले हे सर्वात मोठे क्वॉयर (समूहगीत) ठरले. अॅक्वेरिएस प्रोडक्शन्सचे मुलांचे नाटक ‘गो विथ द फ्लो’ ने विविध पिढ्यांमध्ये जागरूकता निर्माण केली, तर टेक आर्टिस्ट लेक हेकमन व पर्यावरण फोटोग्राफर सारंग नाईक यांच्या सर्वोत्तम इन्स्टॉलेशनने मुंबई व महाराष्ट्रातील सागरी परिसंस्थेला साजरे केले, जेथे १,६०० हून अधिक अभ्यागतांनी उपस्थिती दर्शवली आणि पर्यावरणाबाबत जागरूकतेला चालना देण्यात आली.
वाढत्या तापमानावर मात करणारे आर्किटेक्चर व शहरी धोरणापासून सर्वोत्तम इन्स्टॉलेशन्स व प्रत्यक्ष अनुभवापर्यंत कॉन्शिअस कलेक्टिव्ह २०२५ मध्ये ३० जागरूक रिटेलर्स, हवामानाला प्रतिसाद देणाऱ्या राहणीमानावर ५० हून अधिक वर्कशॉप्स, जागतिक तज्ञांसोबत ४० विचारशील चर्चासत्रे, रिक्लेमिंग कूलवर आधारित ५ म्युझिक व थिएटर परफॉर्मन्स यांचा समावेश होता. शाश्वततेवर आधारित अॅनिम फिल्म फेस्टिवल, अजबघरचे लाइव्ह–कोडेड जनरेटिव्ह म्युझिक आणि कोम्यूनच्या स्पोकन वर्ड परफॉर्मन्स यासह कॉन्शिअस कलेक्टिव्ह २०२५ ने प्रत्येकाला अद्वितीय अनुभव दिला, ज्यामधून सिद्ध झाले की जागरूक राहणीमान सर्वसमावेशक, उत्साहवर्धक व प्रेरणादायी असू शकते.
या इव्हेण्टने जवळपास २०० दशलक्ष सोशल मीडिया इम्प्रेशन्स निर्माण केले आणि #ConsciousCollective2025 सारख्या प्लॅटफॉर्म्सवर ट्रेण्ड झाला, ज्यामधून या इव्हेण्टची प्रासंगिकता आणि समुदायावरील वाढता प्रभाव दिसून आला.
कॉन्शिअस कलेक्टिव्ह आपल्या उत्पादने व सोल्यूशन्सच्या गुड अँड ग्रीन पोर्टफोलिओच्या माध्यमातून ५० टक्क्यांहून अधिक उत्पन्न निर्माण करण्याला चालना देण्याच्या जीईजीच्या मोठ्या ध्येयाशी संलग्न आहे.
या इव्हेण्टला कॉन्शिअस ब्रँड्सनी पाठबळ दिले, जसे व्होल्व्हो कार्स इंडिया, बिर्ला ओपस, एड–ए–मममा आणि ईमोटोरॅड.


