पुणे महानगरपालिका निवडणूक-२०२५-२६ चे आचारसंहिता कालावधीत उमेदवार/राजकीय पक्ष यांना चौक सभा / कोपरा सभा पुणे महानगरपालिकेच्या ताब्यातील रस्ते, अॅमेनिटी स्पेस, मोकळी जागा,खेळाचे मैदान, प्राथमिक / माध्यमिक शाळांची मैदाने येथे सभांना मान्य दराने परवानगी देणे करिता मा.महापालिका आयुक्त ठराव क्र.६/७०५ दि.१८/१२/२०२५ अन्वये मान्यता प्राप्त झाली आहे. त्याअनुषंगाने प्रचार सभांसाठी परवानगी देणेकरिता मालमत्ता व्यवस्थापन विभाग व शिक्षण मंडळ विभाग, पोलिस विशेष शाखा यांचेकडून प्रचार सभेसाठी उपलब्ध ठिकाणांची यादी प्राप्त झाली आहे. तसेच महानगरपालिकेची उद्याने प्रचलित धोरण व अटी-शर्ती नुसार राजकीय पक्षांना राजकीय सभा व तदनुषंगिक कार्यक्रमास तसेच उद्यानामध्ये राजकीय झेंडे, बॅनर, पोस्टर्स, इत्यादी लावण्यास परवानगी दिली जात नाही असे उद्यान विभागा मार्फत कळविण्यात आले आहे. उपरोक्त ठरावानुसार व प्रचार सभेसाठी पुणे मनपा विवध विभागाकडील सभेंसाठी उपलब्ध ठिकाणाची यादी, दैनिक भाडे शुल्क, अनामत शुल्क, सफाई शुल्क, तसेच पोलिस विशेष शाखा मार्फत सभेसाठी उपलब्ध ठिकाणांची यादी, पुणे महानगरपालिकेच्या www.pmc.gov.in संकेतस्थळावर Circular व Press Note सदरात प्रसिद्ध करण्यात आले आहे.
तरी संबंधित उमेदवार / राजकीय पक्ष यांनी प्रचार सभा / कोपरा सभा / चौक सभा घेणेकरिता अर्ज संबंधित क्षेत्रिय कार्यलयाकडे एक खिडकी योजना कक्षाकडे सादर करणे आवश्यक आहे. पुणे महानगरपालिकेकडील विविध विभाग व पोलिस विशेष शाखा मार्फत सभेसाठी उपलब्ध ठिकाणांची यादीनुसार तसेच दैनिक भाडे शुल्क, अनामत शुल्क, सफाई शुल्क, इत्यादी पुणे महानगरपालिका कोषागारात भरलेनंतर विहित अटी-शर्ती नुसार एक खिडकी योजना कक्षा मार्फत प्रचार/ चौक / कोपरा सभा घेणे करिता परवानगी बाबत कार्यवाही करण्यात येईल. परवाना शुल्क व अनामत रक्कम दर्शविणारा तक्ता खालीलप्रमाणे आहे.
प्रचार सभांकरीता खालील अटी/ शर्तीं बंधनकारक राहतील.
रस्ता चौकात/ मोकळ्या जागेत पूर्वपरवानगी न घेता अनधिकृतपणे घेतल्या जाणाऱ्या सभांकरिता परवाना शुल्काचे दीडपटीने दंडात्मक शुल्क संबंधितांकडून वसूल केले जाईल. दंडात्मक शुल्क संबंधितांनी कळविलेल्या मुदतीत महानगरपालिकेकडे न भरल्यास त्यांचेबाबत संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे लेखी पत्राने कळवून वसूलीबाबत कार्यवाही करण्यात येईल.
वरील सभांकरीता वाहतूक पोलिस विभाग व स्थानिक पोलिस विभाग यांचेकडील सक्षम अधिका-याचे ना-हरकत दाखला सादर करणे बंधनकारक राहील.वरील सभांकरीता आवश्यकतेनुसार १०’x१०’ मापाचा स्टेज/मंडप संबंधितांना रस्ता/पदपथावर कोणतेही खड्डे न घेता उभारता येईल .
सभेच्या ठिकाणी स्टेज/मंडप करीता रस्ता/पदपथावर खड्डे घेतल्याचे निदर्शनास आल्यास प्रचलित मंडप धोरणानुसार प्रति खड्डा रूपये २०००/- प्रमाणे दंडात्मक शुल्क संबंधितांकडून वसूल केले जाईल.
सभेच्या परवानगीबाबत वेळोवेळी निवडणूक आयोगामार्फत घालण्यात आलेल्या अटी/शर्ती व निवडणूक आचारसंहितेबाबतची सर्व नियम लागू राहतील.
एकाच जागेवर एकाच वेळी व दिवशी प्रचार सभांकरीता परवानगी मागणीबाबत अर्जाद्वारे मागणी झाल्यास त्याबाबत तेथील निवडणूक निर्णय अधिकारी जो निर्णय देतील तो संबंधितांवर बंधनकारक राहील.अशी माहिती मा.उपायुक्त निवडणूक श्री.प्रसाद काटकर यांनी यावेळी दिली.


