रामायण ब्रम्हांडातील पहिले ग्रंथ महाकाव्य आहे,त्याची रचना त्रेता युगात झाली आहे.

Spread the love

पुणे-२९ डिसेंबर परमपूज्य लोकनाथ स्वामी गुरु महाराज यांनी आज श्रीमद् भागवत कथेमध्ये भगवान श्रीराम यांचे लीला कथा चे वर्णन केले.
भगवान श्रीकृष्ण गोविंद हे आदि पुरुष आहेत अवतारी आहेत त्यांचे अनेक अवतार आहे त्यामधील श्रीराम अवतार हा विशेष आहे हरे कृष्ण महामंत्र असो अथवा जय जय राम कृष्ण हरी असो या मंत्रा मध्ये श्रीराम स्वरूपाचे विशेष उल्लेख आहे.
या आजच्या कथेमध्ये गुरु महाराजांनी आध्यात्मिक जगताचे खगोल शास्त्रीय दृष्टिकोनातून देवी धाम, वैकुंठ धाम, अयोध्या धाम व गोलोक वृंदावन धाम याविषयी माहिती देऊन त्यांचे वर्णन केले.
रामायणाचे रचता वाल्मीक मुनी जे पूर्वश्रमीचे रत्नाकर डाकू होते त्यांना नारद मुनींची कृपा प्राप्त होऊन रामनाम जपण्याचा संधी प्राप्त झाली व राम नामाच्या जपात त्यांना सिद्धी प्राप्त झाली व राम नामाचा जपा करतानाच त्यांना भगवान श्री राम यांच्या लीलांचे दर्शन प्राप्त झाले. वाल्मीक मुनींच्या तपस्यांचे त्यांनी वर्णन केले व त्यांनी माहिती दिली की वाल्मीक मुनींचे गुरु महाराज हे नारद मुनी होते त्याचप्रमाणे व्यास देवांचे गुरु महाराज देखील नारद मुनी आहेत व त्यांनी श्रीमद्भागवत ग्रंथाची रचना केलेली आहे..
रामायणाच्या प्रथमकांड मध्ये बालकांड आहे व तेथेच संक्षिप्त रामायण महात्म्य १०० श्लोकांचा अध्याय आहे तो साक्षात नारद मुनी यांनी वाल्मिकी मुनी यांना सांगितला.
चतुर्मुखी ब्रम्हा यांनी वाल्मीक मुनीना प्रेरणा प्रोत्साहन देऊन देवी सरस्वती ही त्यांच्या जिभेवर बसवल्याने त्यांना श्लोक करण्याची क्षमता व प्रेरणा प्राप्त झाली व रामायण लिहिण्याची सारी व्यवस्था त्यांनी केली व भविष्यवाणी केली की जोपर्यंत चंद्र, सूर्य, तारे, नदी व पर्वत आहेत तोपर्यंत वाल्मीक मुनींची रचना असणारा रामायण ग्रंथांचा प्रचार व प्रसार होत राहील ही भविष्यवाणी ब्रह्मदेवांची आहे त्यांच्या प्रेरणेनेच वाल्मीक मुनी यांनी सात कांडा मध्ये पाचशे स्वर्ग व २४००० श्लोकांची रचना केली रामायण हा ब्रम्हांडातील पहिला ग्रंथ महाकाव्य आहे यावेळी श्रुतीशास्त्र व स्मृतीशास्त्र यामधील फरक वर्णन केला व त्रेता युगामध्ये दहा लाख वर्षांपूर्वी रामायण या ग्रंथाची रचना केली असे त्यांनी सांगितले.
श्रीराम व लक्ष्मण हेच पाच हजार वर्षांपूर्वी श्रीकृष्ण व श्रीबलराम म्हणून अवतरीत झालेत व त्यानंतर पाचशे वर्षांपूर्वी कलियुगात गौरांग महाप्रभू व नित्यानंद प्रभू म्हणून ते उत्तीर्ण झाले अशी माहिती दिले.
भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न हे विष्णुतत्व असल्याचे त्यांनी सांगितले व आपल्या रसाळ वाणीने कोणत्या कांड मध्ये कोणती लिला झाली याचे सविस्तर वर्णन केले.
भगवान श्रीराम यांनी या पृथ्वीतलावर अकरा हजार वर्षे राज्य केले त्यांचे राज्य हे “रामराज्य” म्हणूनच प्रसिद्ध आहे हे देखील सांगितले भगवान श्रीराम यांना एकवेळा वनवास भेटला परंतु देवी सीता यांना दोन वेळा वनवास प्राप्त झाला दुसऱ्यांदा भगवान श्रीराम यांच्या आदेशाने गर्भवती सीता देवी यांना वाल्मीक मुनींच्या आश्रमाजवळ लक्ष्मण यांनी सीता देवी यांना सोडून दिले तेथे वाल्मिकी मुनी रामायणाची रचना करत होते व ते श्लोक सीतादेवी यांना वाचून दाखवत होते त्यामुळे गर्भातच लव आणि कुश यांना रामायणाचे नाव ज्ञान प्राप्त झाले पुढे वाल्मिकी मुनी यांनी रामायणाचा प्रचार करण्यासाठी लव आणि कुश यांना शिक्षण दिले व लव व कुश यांनी संगीतमय रामायण ग्रंथाचे लीला कथा कसा प्रचार केला याचे सविस्तर वर्णन केले. पुढे अयोध्या मध्ये रामकथा कशी झाली याचे सविस्तर वर्णन करत गुरु महाराजांनी राम कथा श्रवण करणारे कसे अष्टसात्विक विकार प्रगट करतात याचे देखील वर्णन केले.
जेव्हा आपण भगवंतांचे कथा श्रवणा मध्ये तल्लीन होतो तेव्हा आपण भगवंतांच्या समावेत म्हणजेच वर्तमान काळातच असतो आणि व्यक्ती कुठल्याही प्रकारच्या महत्वकांक्षा व लोभी प्रवृत्तीचे पासून दूर होतो याचे देखील वर्णन केले रामकथे मुळे आपण सदाचार, शिष्टाचार, सदगुण याचे कसे पालन करतो याचे देखील वर्णन परमपूज्य लोकनाथ स्वामी गुरु महाराज यांनी या कथेद्वारे केले.
राम कथेनंतर वृंदावनातील भक्त समूहाने श्रीकृष्ण लिला नाटिका प्रस्तुत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *