पुणे. पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने कामकाजाचा आढावा घेणेसाठी मुख्य निवडणूक निरीक्षक श्री राहुल महिवाल (भा.प्र.से.) यांनी शुक्रवार दि.०२/०१/२०२६ रोजी दुपारी ४:३० वाजता, मा.स्थायी समिती सभागृह, दुसरा मजला, पुणे महानगरपालिका येथे आढावा बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीत संबंधित विभागांचे अधिकारी यांनी त्यांचेकडील कामकाजाच्या सद्यस्तिथीची तर सर्व प्रभागांचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी V.C. द्वारे त्यांचेकडील कामकाजाच्या अद्यावत माहिती दिली.
मुख्य निवडणूक निरीक्षक श्री. राहुल महिवाल यांनी निवडणूक तयारी बाबत समाधान व्यक्त करुन निवडणुकीचे कामकाज हे निष्पक्ष व पारदर्शीपणे होणे आवश्यक असून आचारसंहिता भंगाच्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या प्रत्येक तक्रारीवर निष्पक्षपणे कार्यवाही करावी, प्रत्येक प्राप्त तक्रारींची गांभीर्याने दखल घ्यावी, उपद्रवी घटनांवर तातडीने नियंत्रण मिळवावे, विशेषत: रात्रीच्या वेळी आचारसहिंतेचे उल्लंघन होऊ नये यासाठी FST, SST, VST पथकांमार्फत कार्यवाहीचे प्रमाण वाढवावे, Sweep बाबत, आचारसंहिता बाबत आयोगाने दिलेल्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, निवडणुका आदर्श व पारदर्शी होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशा सूचना केल्या. तसेच निवडणूक निरीक्षक श्री. अरुण आनंदकर यांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. अशा सूचना दिल्या. तसेच सर्व निवडणूक निर्णय अधिकारी सर्व कक्ष प्रमुख, पुणे महानगरपालिकेचे अधिकारी, पोलीस आयुक्त पुणे व पिंपरी चिंचवड, आयकर आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभाग व प्रादेशिक परिवहन विभाग यांनी योग्य ते समन्वय साधून निवडणूक सुरळीत पारपाडण्याच्या अनुषंगाने उचित कार्यवाही करावी अशा सूचना केल्या आहेत.
सदर बैठकीस निवडणूक निरीक्षक श्री अरुण आनंदकर, अपर जिल्हाधिकारी, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त(विशेष) श्री ओमप्रकाश दिवटे, तसेच पोलिस आयुक्त, पुणे शहर व ग्रामीण यांचे प्रतिनिधी, परिवहन आयुक्त कार्यालयाकडील अधिकारी, अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाकडील संबंधित अधिकारी, आयकर आयुक्त कार्यालयाकडील अधिकारी, निवडणूक कार्यालयाकडील निवडणूक कर्मचारी नेमणूक व व्यवस्थापन कक्ष, बाकी ना-हरकत प्रमाणपत्र कक्ष, माहिती व जनसंपर्क कक्ष, दूरसंचार सुविधा कक्ष, आचारसंहिता कक्ष, पेड न्यूज कक्ष, वाहतूक व्यवस्थापन कक्ष, ई.व्ही.एम.कक्ष, निवडणूक खर्च कक्ष, तक्रार निवारण व तथा मिडिया कक्ष, निवडणूक कम्युनिकेशन प्लॅन, निवडणूक प्रशिक्षण कक्षांचे कक्ष प्रमुख ई. उपस्तीथ होते. याशिवाय सर्व निवडणूक निर्णय अधिकारी हे V.C. द्वारे उपस्तीथ होते.
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ -२६ आढावा बैठक संपन्न


