पुण्यात खंडणी विरोधी पथकाची मोठी कारवाई: देशी बनावटीची पिस्तूल, जिवंत काडतुसे व गांजा जप्त; दोघांना अटक

Spread the love

पुणे :पुणे शहर गुन्हे शाखेअंतर्गत खंडणी विरोधी पथक – २ यांनी केलेल्या कारवाईत देशी बनावटीची पिस्तूल, जिवंत काडतुसे तसेच गांजासारखा अमली पदार्थ जप्त करून दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई नांदेड सिटी पोलीस ठाणे हद्दीत करण्यात आली.

पथक पेट्रोलिंग करत असताना जाधव नगर, नांदेड फाटा, सिंहगड रोड परिसरातील एका फ्लॅटमध्ये काही तरुणांकडे बेकायदेशीर शस्त्र असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्या माहितीनुसार सापळा रचून पोलिसांनी छापा टाकला. कारवाईदरम्यान

1. आर्यन राहुल सातपुते (वय 19)
2. एक विधीसंघर्षग्रस्त बालक
यांना ताब्यात घेण्यात आले.

झडतीदरम्यान आरोपींकडून

* 01 देशी बनावटीची पिस्तूल
* 01 जिवंत काडतूस (अंदाजे किंमत 40,500)
* 159 ग्रॅम गांजा (किंमत सुमारे 2,000)

असा एकूण 42,600 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .

या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम, महाराष्ट्र पोलीस अधिनियम तसेच एनडीपीएस कायद्यान्वये नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही यशस्वी कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), उप पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक – २ मधील अधिकारी व अंमलदारांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *