महाराष्ट्र राज्याच्या स्पर्धात्मक विकासासाठी अहोरात्र मेहनत करणारी संस्था म्हणजे ध्येय एज्युकेशन फाउंडेशन अंतर्गत ध्येय अकॅडमी महाराष्ट्र आयोजित आय एम विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा 4 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये संपन्न झाली. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या पालकांच्या, गुरुजनांच्या मुख्याध्यापकांच्या व शाळा प्रमुखांच्या, ध्येय परिवारातील सदस्यांच्या सहकार्यातून एवढं मोठं कार्य महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी पार पडले. या परीक्षेमध्ये 2,07,442 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. महाराष्ट्रातील 2527 केंद्रावर झालेली परीक्षा पारदर्शक व स्पर्धा परीक्षेचा आदर्श कसा असावा याचे उत्तम दर्शन महाराष्ट्र ला या माध्यमातून घडविण्यात आले.
परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया, त्यांच्या चेहऱ्यावर असणारा आत्मविश्वास, पालकांच्या चेहऱ्यावर असणारे आनंद, गुरुजन बंधू भगिनींच्या मनोगतातून आलेले संस्थेविषयी विचार यातून महाराष्ट्राचे भविष्य किती मोठी असेल याची प्रचिती या माध्यमातून पाहण्यास मिळाली. महाराष्ट्राला देश पातळीवर होणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी एक प्रेरणादायी व सकारात्मक विचार घेऊन ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी तळागाळापर्यंत भव्य कार्य करत आहे त्यातून दिव्य स्वप्नपूर्ती होणार ही भावना आज महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनात जागृत झाली आहे.
या परीक्षा घेण्याचा हेतू महाराष्ट्राला स्पर्धात्मक दृष्ट्या देशपातळीवर अव्वल स्थान मिळावे, क्लास वन क्लास टू अथवा देशपातळीवर उच्च पदावर महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांना संधी मिळावी, यातून महाराष्ट्राचा शैक्षणिक विकास देशभर आदर्श ठरावा. आपल्या महाराष्ट्राचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत शैक्षणिक दृष्ट्या सुवर्ण अक्षरावर कोरल जावा या हेतूने क्षितिजाच्या पलीकडची स्वप्न ध्येय एज्युकेशन फाउंडेशन ने मनी बाळगली गेली ,एकच ध्येय विद्यार्थी विकास संस्थेच्या ब्रीद आहे ते सत्यात उतरण्यासाठी संस्थेने केलेल्या प्रेरणादायी काम हे उल्लेखनीय आहे आणि एवढे मोठे काम करताना विद्यार्थ्याचे अथक परिश्रम, गुरुजनांच मार्गदर्शन , पालकांचे सहकार्य, शाळा प्रमुखांचा परीक्षेविषयी असणारा सकारात्मक दृष्टिकोन, ध्येय परिवारातील सदस्यांचे नेतृत्व व संस्थेतील राज्य जिल्हा विभाग वेगवेगळ्या असणाऱ्या समितीवर असणारे सदस्यांचे कर्तुत्व आणि संस्थेचे विचार या सर्वांच समीकरण म्हणजेच 4 जानेवारी 2026 रोजी विद्यार्थी प्रिय आय एम विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा यशस्वी परीक्षा पडली गेली.
या परीक्षेमध्ये मातृभाषेचा विकास, गणित विषयाचा सखोल ज्ञान , बुद्धिमत्ता विषयामधून बुद्धिमत्तेचा विकास व इंग्रजी विषयावर प्रभुत्व प्रस्थापित करणे आणि एकंदर स्पर्धात्मक विकास, सर्जनशील तिला वाव ,बुद्धिमत्तेला चॅलेंज गुणवत्तेला आस तर उज्ज्वल भविष्याचा ध्यास घेऊन चालणारी संस्था म्हणजे ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांची, पालकांची, गुरुजनांची, शाळा प्रमुखांची , प्रत्येक सदस्यांची नागरिकांची आहे. त्यामुळे संस्थेला सर्वांचं सहकार्य आवश्यक आहे जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला उचित व दिव्य स्वप्न साकार करण्यासाठी संधी मिळेल प्रत्येकाला आपली ज्ञानाची ताकद येईल व प्रगती,विकास साधता येईल.
जगाच्या पाठीवर आज कोणती गोष्ट कोणी मोफत देत नाही गुणवत्ता तर लांबच आपली संस्था गुणवत्ता पाहते, आपले संस्था विद्यार्थ्यांचे भविष्य पाहते, आपली संस्था भविष्यामध्ये पालकांना आपल्या पल्याची करिअरची चिंता असणारी ती चिंता दूर करते. गुरुजन व शाळा यांना सहकार्य करते.
ग्रामीण भागातील विविध उपक्रमाद्वारे मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करते आणि आज महाराष्ट्रात जे 2,07,442 मुलं परीक्षेत बसली होती त्यांना मोफत ऑनलाईन क्लास, मोफत उद्बोधन वर्ग, मोफत मोटिवेशनल स्पीच, महिन्याला ऑनलाइन मोफत टेस्ट इत्यादी मोफत गोष्टी विद्यार्थ्याला आपली प्रगती साधण्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत.
महाराष्ट्र शैक्षणिक विकाससाठी व विद्यार्थी प्रगतीसाठी लाखोंचा खर्च करून विद्यार्थ्यांच्या हक्काच व्यासपीठ या माध्यमातून उपलब्ध झाला आहे. भविष्याची स्वप्न पाहणारी महाराष्ट्रातील केवळ काय जगातील एकमेव संस्था आहे तिचे नाव ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आहे.
पालक गुरुजन व शाळा सर्वना संदेश आहे. आपल्या विद्यार्थ्यांना,आपल्या पाल्यांना उचित ध्येयासाठी , उचित प्लॅटफॉर्म असणे गरजेचे आहे , उचित दिशा मिळणे गरजेचे आहे,उचित वेळेत उचित ध्येय देखील प्राप्त करता आलं पाहिजे या सर्वांच उत्तर येथे ध्येय एज्युकेशन फाउंडेशनच्या विविध उपक्रमातून सत्यात उतरण्यासाठी प्लॅटफॉर्म स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून द्या त्यामुळे विद्यार्थ्यांना भविष्याचे, भाग्याचे विद्यार्थ्यांसाठी कायमस्वरूपी दार उघडे होईल.
जय हिंद जय महाराष्ट्र!!
आय एम विनर स्पर्धा परीक्षा- महाराष्ट्र शैक्षणिक विकासासाठी एक नवी दिशा!!


