पुणे, ५, २०२६ – सॅमसंग या भारतातील आघाडीच्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने आज सॅमसंग गॅलेक्सी ए०७ ५जी लाँच केला. या स्मार्टफोनमध्ये ५० मेगापिक्सल मेन कॅमेरा, ६००० एमएएच बॅटरी आहे. हा स्मार्टफोन ऑनलाइन मनोरंजनासाठी, कन्टेन्ट कॅप्चर करण्यासाठी आणि दिवसभर विना-व्यत्यय वापरासाठी डिझाइन करण्यात आला आहे. डेटा सुरक्षिततेच्या दृष्टीने हा स्मार्टफोन अत्यंत चांगला आहे.
”सॅमसंगमध्ये आम्हाला अधिक महत्त्वाकांक्षी असलेल्या तरूण ग्राहकांच्या गरजांबाबत माहित आहे. आजचे जनरेशन झेड अधिक सोशल कन्टेन्ट निर्माण करत आहेत. ते अधिकाधिक मोबाइल गेमिंगचा आनंद घेत आहेत. तसेच अधिक प्रमाणात ऑनलाइन कन्टेन्टचा वापर करत आहेत. सॅमसंग गॅलेक्सी ए०७ ५जी ‘मोअर ऑसम’ असण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. यामध्ये सर्जनशीलता, कार्यक्षमता व मनोरंजनाच्या संयोजनासह मोअर पॉवरफुल ५० मेगापिक्सल कॅमेरा, दीर्घकाळापर्यंत कार्यरत राहणारी ६००० एमएएच बॅटरी आणि अधिक आकर्षक १२० हर्ट्झ डिस्प्ले आहे. आम्हाला भारतातील तरूणांसाठी डिझाइन करण्यात आलेला हा परिपूर्ण स्मार्टफोन लाँच करताना आनंद होत आहे,” असे सॅमसंग इंडियाच्या एमएक्स बिझनेसचे उपाध्यक्ष आदित्य बब्बर म्हणाले.
सडपातळ व शक्तिशाली रचना
गॅलेक्सी ए०७ ५जी लाइट व्हायोलेट, लाइट ग्रीन व ब्लॅक या तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टफोनचे वजन १९९ ग्रॅम आहे. जाडी ८.२ मिमी आणि स्लीक की आयलँड २.० फ्लॅट साइड फ्रेमसह येतो. यामुळे अधिक मजबूत ग्रिपची खात्री मिळते. या स्मार्टफोनमध्ये ६.७-इंच एफडी+ डिस्प्लेसह १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आहे. ज्यामधून व्हिडिओ व वेब ब्राऊजिंगसाठी सहज ट्रान्झिशन्स व स्क्रॉलिंगची खात्री मिळते. स्क्रिनचा हाय-ब्राइटनेस मोड (एचबीएम) ८०० नीट्सपर्यंत पोहोचत प्रखर सूर्यप्रकाशात देखील डिस्प्ले सुस्पष्टपणे दिसण्याची खात्री देतो. यामुळे ग्राहक चालता-फिरता फोटो कॅप्चर, एडिट व शेअर करू शकतात.
अधिक टिकाऊपणासाठी गॅलेक्सी A07 5G मधील डिस्प्ले २-स्टेप टेम्पर्ड ग्लासच्या माध्यमातून सुरक्षित आहे आणि धूळरोधक व जलरोधकसाठी आयपी५४ प्रमाणित आहे. या डिवाईसची मागील बाजू नवीन ग्लास फायबर रिइन्फोर्स पॉलिमर (जीएफआरपी)सह अपग्रेड करण्यात आली आहे. हे मटेरिअल सडपातळ असण्यासह मागील जनरेशनच्या तुलनेत अधिक मजबूत आहे.
प्रगत कॅमेरा आणि बॅटरी
या स्मार्टफोनच्या मागील बाजूस आयकॉनिक ट्रॅक कॅमेरा डेकोसह हाय-रिझॉल्यूशन ड्युअल-कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये उच्च दर्जाच्या फोटोसाठी ५० मेगापिक्सल ऑटोफोकस वाइड कॅमेरा आणि अधिक सुस्पष्टतेसाठी २ मेगापिक्सल कॅमेरा आहे.
मेन कॅमेराचे एफ१.८ अर्पेचर, तसेच २ मेगापिक्सल डेप्थ कॅमेरा मूळ गोष्टींवर लक्ष केंद्रित करत आणि पार्श्वभूमीला अस्पष्ट करत आकर्षक बोकेह इफेक्ट देतात. वाइड-अँगल सेटअप आकर्षक रंगसंगती व सुस्पष्टतेसाठी सुरेखरित्या डिझाइन करण्यात आले आहे, जे प्रखर व अंधुक प्रकाशात सुस्पष्टपणे फोटो कॅप्चर करण्याची खात्री देते. या स्मार्टफोनमधील ८ मेगापिक्सल फ्रण्ट कॅमेरा किमान आवाजासह आकर्षक सेल्फीज व व्हिडिओ कॅप्चर होण्याची खात्री देतो.
दिवसभर कार्यरत राहण्यासाठी गॅलेक्सी ए०७ ५जी मध्ये ६००० एमएएच बॅटरी आहे, जी पूर्वीच्या डिवाईसच्या तुलनेत २० टक्के अधिक क्षमतेची आहे. या शक्तिशाली बॅटरीसह २५ वॅट फास्ट चार्जिंग डिवाईस दिवसभर कार्यरत राहण्याची खात्री देते, ज्यासह दीर्घकाळापर्यंत यूट्यूबवर व्हिडिओ स्ट्रीम करता येतात किंवा सोशल मीडिया ब्राऊज करता येते. गॅलेक्सी A07 5G मधील सानुकूल पॉवर मॅनेजमेंट काम व मनोरंजनासाठी विनाव्यत्यय कार्यक्षमतेची खात्री देते.
मन:शांतीसाठी अद्वितीय सुरक्षितता
गॅलेक्सी A07 5G मध्ये सॅमसंग वॉलेटच्या माध्यमातून यूपीआय पेमेंट्ससाठी बायोमेट्रिक ऑथेन्टिकेशन आहे. वापरकर्ते त्यांचे फिंगरप्रिंट किंवा फेस रेकग्निशनचा वापर करत व्यवहार करू शकतात, ज्यामुळे मॅन्युअल इनपूटची गरज दूर होते आणि दैनंदिन व्यवहार फोन लॉक करण्याप्रमाणे जलद व प्रभावीपणे होतात.
गॅलेक्सी A07 5G संवेदनशील माहिती सुरक्षितपणे स्टोअर करण्यासाठी आणि पेमेंट्सचे त्वरित सत्यापन करण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. या डिवाईसमधील खास वैशिष्ट्य म्हणजे सॅमसंग नॉक्स वॉल्ट. या हार्डवेअर-आधारित सोल्यूशनसह त्याचे स्वत:चे प्रोसेसर व मेमरी आहे. हे सेटअप ऑपरेटिंग सिस्टमव्यतिरिक्त वेगळे आहे, ज्यामधून एन्क्रिप्शन कीज, बायोमेट्रिक क्रेडेन्शियल्स आणि ऑथेन्टिकेशन माहिती अशा संवेदनशील डेटासाठी सुरक्षित वातावरण निर्माण होते. एकत्रित, सर्व महत्त्वपूर्ण डेटा सुरक्षित ठिकाणी स्टोअर केला जातो, जो मुख्य सिस्टमबाबत तडजोड झाली तरी नियमित सॉफ्टवेअर लेयर किंवा अॅप्सना उपलब्ध होऊ शकत नाही.
तसेच, गॅलेक्सी A07 5G चे ऑटो ब्लॉकर वैशिष्ट्य सुरक्षिततेला संभाव्य धोका असल्यास अॅप्सच्या इन्स्टॉलेशनला प्रतिबंध करते, तसेच बिल्ट-इन थेफ्ट प्रोटेक्शन डिवाईस हरवल्यास तणाव येऊ देत नाही.
दीर्घकाळापर्यंत विश्वसनीयता आणि विनासायास कनेक्टीव्हीटी
गॅलेक्सी A07 5G आधुनिक वन यूआय ८.० (अँड्रॉईड १६ वर आधारित)वर ऑपरेट होतो. या डिवाईसमध्ये साधी, विशिष्ट व सर्वोत्तम डिझाइनसह सोईस्कर नोटिफिकेशन मॅनेजमेंट व साध्या स्वाइप गेस्चर्ससह सहजपणे माहिती उपलब्ध होण्याची सुविधा आहे. सुधारित वैयक्तिककरण पर्याय विभिन्न आकाराचे व उत्साही विजेट्स उपलब्ध करून देतात. तसेच, सॅमसंगची दीर्घकाळापर्यंत टिकाऊपणाबाबत कटिबद्धता गॅलेक्सी A07 5G च्या सहा वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स आणि सहा वर्षाच्या ओएस अपग्रेड्समधून दिसून येते, ज्यामधून हा डिवाईस आगामी काळात देखील सुरक्षित व अद्ययावत राहण्याची खात्री मिळते.
१२ बँड्समध्ये ५जी कनेक्टीव्हीटीसह गॅलेक्सी A07 5G संपूर्ण भारतात जलद व विश्वासार्ह नेटवर्क कार्यक्षमता देतो. व्हिडिओज स्ट्रिमिंग करायचे असो, दुरून काम करायचे असो किंवा प्रियजनांच्या संपर्कात राहायचे असो हा स्मार्टफोन विनासायास अनुभवाची खात्री देतो.
उपलब्धता, किंमत आणि ऑफर्स
सॅमसंग गॅलेक्सी A07 5G ४ जीबी + १२८ जीबी आणि ६ जीबी + १२८ जीबी (मायक्रोएसडीच्या माध्यमातून जवळपास २ टीबीपर्यंत विस्तारित करता येणाऱ्या स्टोरेजसह) या दोन व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध आहे. सॅमसंगच्या जवळपास १८ महिन्यांपर्यंतच्या विशेष नो-कॉस्ट ईएमआयचा आनंद घेता येईल. ज्यामुळे या स्मार्टफोनची किंमत अनुक्रमे अंदाजे १५,९९९ रुपये आणि १७९९९ रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे.


