पुणे, १२ डिसेंबर: पिंपरीतील नेहरूनगर येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर १३ ते १८ डिसेंबर २०२५ दरम्यान होणाऱ्या प्रतिष्ठित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्पर्धेत १४ संघांमध्ये चुरस आहे.
सहभागी संघांमध्ये १३ वरिष्ठ (सीनियर) आणि एका बाहेरील (मुंबई) संघाचा समावेश आहे. वरिष्ठ संघांमध्ये क्रीडा प्रबोधिनी; जीएसटी आणि कस्टम्स, पुणे; आयकर, पुणे; एक्सलन्सी अकादमी; विक्रांत हॉकी अकादमी; फ्रेंड्स युनियन क्लब; पुणे मॅजिशियन; पीसीएमसी अकादमी; पूना हॉकी अकादमी; खडकी हॉकी अकादमी; किड्स इलेव्हन; पुणे सिटी पोलिस; हॉकी लव्हर्स स्पोर्ट्स क्लब आणि मुंबईचा रिपब्लिकन स्पोर्ट्स क्लब असे संघ खेळतील.
हॉकी महाराष्ट्र आयोजित ही नॉक-आउट स्पर्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंती सोहळ्याचा एक भाग आहे.
सहा दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचा अंतिम सामना गुरुवारी, १८ डिसेंबर २०२५ रोजी होईल, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा समितीचे अध्यक्ष महेंद्र निकाळजे यांनी दिली.
स्पर्धेतील विजेत्या, उपविजेत्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या संघांना ट्रॉफी व्यतिरिक्त, स्पर्धा समितीतर्फे अनुक्रमे ५०,००० रुपये, ३०,००० रुपये आणि २०,००० रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे. याशिवाय वैयक्तिक पुरस्कारही दिले जातील.
दरम्यान, स्पर्धा संचालक म्हणून विवेक काळे यांचीn नियुक्ती करण्यात आली आहे.
उद्घाटनानंतर दुपारी १२ वाजता सलामीचा सामना खेळवला जाईल.
स्पर्धेच्या पहिल्या तीन दिवशी एकूण तीन सामने खेळवले जातील.


