प्रभाग २४ (ब) मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सुजाता सदानंद शेट्टी यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत प्रचाराला वेग दिला आहे. प्रभाग सर्वांगीण विकास करण्याचा माझा प्रयत्न आहे,
संवाद यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
त्यांनी सोसायट्या, वसाहती व गल्लीबोळांत घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संपर्क साधला.
नागरिकांच्या समस्या, सूचना व अपेक्षा ऐकून घेऊन त्यांची नोंद करून सोडवणुकीचे आश्वासन दिले.
प्रभागाचा नियोजनबद्ध, पारदर्शक व सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार व्यक्त केला.
सदाआनंदनगर, कानिफनाथ मंदिर परिसर, रास्ता पेठ आदी भागांत संवाद यात्रा झाली.
पक्षातील वरिष्ठ नेत्यांशीही भेटीगाठी व चर्चा करण्यात आल्या.
नागरिकांचा विश्वास, सहभाग आणि सहकार्य हाच विकासाचा आधार असल्याचे त्यांनी नमूद केले.
संवादात्मक प्रचारामुळे मतदारांमध्ये विश्वास वाढत असून प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे,


