मुलांच्या विभागात सेंट व्हिन्सेंटचा दबदबा

Spread the love

 टीआरएसी-७६) आंतरशालेय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा; मुलींच्या विभागात एमईएस बाल शिक्षण स्कूलचे वर्चस्व कायम

 
पुणे, २८ जानेवारी: पाषाण येथील लोयोला हायस्कूलच्या अ‍ॅथलेटिक ट्रॅकवर सुरू असलेल्या रियुनियन अ‍ॅथलेटिक्स  स्पर्धेच्या (टीआरएसी-७६) आंतरशालेय अ‍ॅथलेटिक्स स्पोर्ट्स मीटमध्ये दुसऱ्या दिवशी मुलांच्या गटात सेंट व्हिन्सेंट हायस्कूलच्या खेळाडूंनी वर्चस्व गाजवत आघाडी घेतली.
सेंट व्हिन्सेंटच्या एच.एस. मुलांच्या संघाने बुधवारी १७ वर्षांखालील गटात तीन, १४ वर्षांखालील गटात चार आणि १२ वर्षांखालील गटात एक अशी आठ विजेतेपदे पटकावली.
मुलींच्या गटात एमईएस बाल शिक्षण स्कूल संघाने १२ वर्षांखालील गटात एक, १४ वर्षांखालील गटात तीन आणि १७ वर्षांखालील गटात दोन अशा सहा विजेतेपदांची कमाई केली.
यजमान लोयोला एच.एस. संघाने १२ वर्षांखालील गटात तीन आणि १९ वर्षांखालील गटात मुले आणि मुलींमध्ये प्रत्येकी एक अशी तीन विजेतेपदे मिळवली.
२०० मीटर धावणे प्रकाराच्या अंतिम फेरीत, अनुष देवकरने (लोयोला एच.एस.) २५.२३ सेकंद अशा सर्वोत्तम वेळेसह मुलांच्या गटामध्ये बाजी मारली. त्याचा सहकारी विश्वजीत मुंडेने २६.९९ सेकंद आणि अंश दुर्गेने २९.१३ सेकंदांसह अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला.
मुलींच्या गटाच्या २०० मीटर धावणे प्रकाराच्या अंतिम फेरीत यजमान लोयोला एच.एस.च्या इंग्रिड मॅन्युएलने २९.९६ सेकंदांसह अव्वल स्थान पटकावले. अमोलिका आचार्य (द कल्याणी स्कूल) ३४.०८ सेकंदांसह दुसऱ्या स्थानावर राहिली. सेंट फेलिक्स एच.एस. च्या अख्तर शेखने ४८.३० सेकंदांसह तिसरे स्थान मिळवले.
दुसऱ्या दिवशी मुले आणि मुलींच्या गटात प्रत्येकी दहा अशा एकूण २० स्पर्धा झाल्या.
निकाल: 
14 वर्षांखालील मुले: 600 मीटर: 1-कौशिकी उरलापू (सेंट व्हिन्सेंट एचएस, कॅम्प; 1:47.23 सेकंद); 2-विराज अग्रवाल (बिशप्स कॅम्प; 1:47.79 सेकंद); ३- अंश लोढा (सेंट व्हिन्सेंट एचएस, कॅम्प; १: ५३.४८सेकंद)
14 वर्षाखालील मुली: 600 मीटर: 1-अर्व स्वामी (MES बाल शिक्षण मंदिर; 1:52.52 सेकंद); 2-अन्विता बोर्डे (MES बाल शिक्षण मंदिर; 1:55.00 सेकंद);
12 वर्षाखालील मुली: 300 मीटर: 1-सुरभी खाडे (आर्यन्स स्कूल; 55.62 सेकंद); 2-कौशिकी जाधव (आर्यन्स स्कूल; 1:00.90 सेकंद);
12 वर्षांखालील मुले: 300 मीटर: 1-अयान राऊत (सेंट व्हिन्सेंट एचएस, कॅम्प; 49.89 सेकंद); 2-मानस भिंगारदिवे (सेंट व्हिन्सेंट एचएस, कॅम्प; 52.63 सेकंद); ३-देवाशिष भोरेकर (एमईएस बाल शिक्षण मंदिर; ५३.६४ सेकंद)
17 वर्षांखालील मुली: लांब उडी: १-वेदिका पाटील (एमईएस बाल शिक्षण मंदिर; ४.४० मीटर); 2-दिशा कोरडे (हचिंग्स कॅम्प; 3.88 मीटर); ३-मनुश्री पवार (आर्यन्स स्कूल; ३.३६ मीटर;
14 वर्षाखालील मुली: 200 मीटर: 1-साक्षी हुंदलेकर (एमईएस बाल शिक्षण मंदिर; 29.17 सेकंद); 2-तेजल लिगाडे (आर्यन्स स्कूल; 30.22 सेकंद); ३-बतूल हुजेफा रेतीवाला (संस्कृती शाळा, उंड्री कॅम्पस; ३०.३४ सेकंद .
19 वर्षांखालील मुले: 200 मीटर: 1-अनुष देवकर (लोयोला एचएस, पुणे; 25.23 सेकंद); 2-विश्वजीत मुंडे (लोयोला एचएस, पुणे; 26.99 सेकंद); ३-अंश दुर्गे (लोयोला हायस्कूल; २९.१३ सेकंद)
17 वर्षांखालील मुली: 200 मीटर: 1-प्रांजल पगडिया (बालशिक्षण मंदिर; 29.89 सेकंद); 2-वेदिका पाटील (एमईएस बाल शिक्षण मंदिर; 32.20 सेकंद); ३-राजलक्ष्मी परदेशी (सेंट ॲन्स एचएस, कॅम्प; ३२.३८ सेकंद)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *