४०० मीटर धावणे प्रकारामध्ये अनुष, अमोलिका अव्वल 

Spread the love

– टीआरएसी-७६ आंतरशालेय ॲथलेटिक्स स्पर्धा; सेंट व्हिन्सेंट आणि एमईएस बालशिक्षण स्कूलला प्रत्येकी दोन जेतेपदे 

पुणे, २९ जानेवारी: पाषाण येथील लोयोला हायस्कूलमच्या अ‍ॅथलेटिक ट्रॅकवर सुरू असलेल्या रियुनियन अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेच्या (टीआरएसी-७६) आंतरशालेय अ‍ॅथलेटिक्स स्पोर्ट्स मीटच्या तिसऱ्या दिवशी १९ वर्षांखालील मुले आणि मुलींच्या ४०० मीटर धावणे प्रकारामध्ये यजमान लोयोला हायस्कूल, पुणे संघाच्या अनुष देवकर आणि द कल्याणी स्कूलच्या अमोलिका आचार्य यांनी विजेतेपद पटकावले.
मुलांच्या ४०० मीटर धावणे प्रकाराच्या अंतिम फेरीत लोयोला हायस्कूलने वर्चस्व राखले. अनुषने ५९.६१ सेकंद अशी सर्वोत्तम वेळ नोंदवली. त्याचे सहकारी मल्हार दरेकर (१:००.३१ सेकंद) आणि लव्या असरानी (१:०३.३३ सेकंद) अनुक्रमे दुसरा आणि तिसरा आला.
मुलींच्या गटात कल्याणी स्कूलच्या अमोलिकाने १:१८.२७ सेकंद अशा वेळेसह अव्वल स्थान पटकावले. तिने तिची सहकारी स्निकथा श्रीरामला (१:१९.१३ सेकंद) थोड्या फरकाने मागे टाकले. नव्या छपरियाने १:२२.६१ सेकंदांसह तिसरे स्थान मिळविले.
१७ वर्षांखालील मुलांच्या १५०० मीटर धावण्याच्या अंतिम फेरीत एमईएस बाल शिक्षण मंदिरचा आदित्य तोंडे (५:०७.५४ सेकंद) पहिला आला. मुलींमध्ये आर्यन स्कूलच्या सिद्धी क्षीरसागरने ६:४७.९० सेकंदांसह अव्वल स्थान पटकावले.
मुलांच्या गटात अनिश भोसलेने (बिशप्स कॅम्प) ५:०७.६७ सेकंद अशा वेळेसह दुसरे आणि अंश श्रृंगरेने (लोयोला)  ५:०९.६६ सेकंदांसह तिसरे स्थान मिळवले. मुलींच्या गटात आर्यन्स स्कूलची सई शाल्हलकर (७:०९.६५ सेकंद) दुसरी आणि द कल्याणी स्कूलची नव्या छपरिया (७:३८.४९ सेकंद) तिसरी आली.
सकाळच्या सत्रामध्ये एकूण नऊ स्पर्धा झाल्या. त्यात सेंट व्हिन्सेंटस एचएस, कॅम्प आणि एमईएस बाल शिक्षणने मुले आणि मुलींच्या गटात प्रत्येकी दोन विजेतेपदे जिंकली.
निकाल: 
१९ वर्षांखालील मुले: ४०० मीटर धावणे: १-अनुष देवकर (लोयोला, पुणे; ५९.६१ सेकंद); २-मल्हार दरेकर (लोयोला; १:००.३१ सेकंद); ३-लव्या असरानी (लोयोला; १:०३.३३ सेकंद).
१९ वर्षांखालील मुली: ४०० मीटर धावणे: 1-अमोलिका आचार्य (कल्याणी स्कूल; 1:18.27  सेकंद); 2-स्निकथा श्रीराम (द कल्याणी स्कूल; 1:19.13 सेकंद); ३-नव्या छापरिया (द कल्याणी स्कूल; १:२२.६१ सेकंद)
१७ वर्षांखालील मुले: १५०० मीटर धावणे: 1-आदित्य तोंडे (एमईएस बाल शिक्षण मंदिर; 5:07.54 सेकंद); 2-अनीश भोसले (बिशप्स कॅम्प; 5:07.67 सेकंद); ३-अंश श्रृंगरे (लोयोला; ५:०९.६६ सेकंद)
 
१७ वर्षांखालील मुले: लांब उडी: १- नॅथन डिसूझा (सेंट व्हिन्सेंट, कॅम्प; ५.५० मीटर); २-जितांशू राऊत (लोयोला; ५.१९ मीटर); ३-जसरीर ओबेरॉय (सेंट व्हिन्सेंट, कॅम्प; ५.१३ मीटर)
१७ वर्षांखालील मुली १५०० मीटर धावणे: १-सिद्धी क्षीरसागर (आर्यन्स स्कूल; ६:४७.९० सेकंद); २-सई शाल्हळकर (आर्यन्स स्कूल; ७:०९.६५ सेकंद); ३-नव्या छपरिया (द कल्याणी स्कूल; ७:३८.४९ सेकंद)
७ वर्षांखालील मुली: ४०० मीटर धावणे: १-प्रांजल पगडिया (एमईएस बालशिक्षण मंदिर; १:१३.३४ सेकंद); २-करिश कक्कट (द कल्याणी स्कूल; १:१४.८२ सेकंद); ३-राजलक्ष्मी परदेशी (सेंट अ‍ॅन्स एच.एस; १:१९.८२ सेकंद)
१४ वर्षांखालील मुले ४०० मीटर धावणे: १-नौफिल आलम (हचिंग्ज कॅम्प; १:०१.७० सेकंद); २-विश्वनाथ पोमन (सेंट व्हिन्सेंट, कॅम्प; १:०३.२५ सेकंद); ३-सोहम सपकाळ (सेंट व्हिन्सेंट, कॅम्प; १:०४.१० सेकंद)
१२ वर्षांखालील मुले ४x१०० मीटर धावणे: १: सेंट व्हिन्सेंट हायस्कूल, कॅम्प; ५७.५८ सेकंद; २-लोयोला हायस्कूल, पुणे; ५७.८२ सेकंद; ३-सेंट व्हिन्सेंट हायस्कूल, कॅम्प; १:००.१५)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *