पूना क्लबकडून जागतिक दर्जाच्या क्रिकेट मैदानाचे अनावरण

Spread the love

चंदू बोर्डे, कपिलदेव यांसारख्या क्रिकेट दिग्गजांच्या उपस्थितीत उद्घाटन

पुणे, ७ एप्रिल २०२६ : ऐतिहासिक पूना क्लब लिमिटेडने आपल्या क्रीडा प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. दिग्गज क्रिकेटपटूंच्या उपस्थितीत नव्याने विकसित केलेल्या जागतिक दर्जाच्या वाळू-आधारित क्रिकेट मैदानाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्याला वर्ल्ड कप विजेते कर्णधार कपिलदेव, माजी कसोटीपटू चंदू बोर्डे, तसेच शुभांगी कुलकर्णी, मिलिंद गुंजाळ आणि श्रीकांत कल्याणी यांच्या उपस्थितीत झाले. या मैदानावर जागतिक दर्जाच्या सुविधा आहेत. ड्रेनेज सिस्टिम उत्तम असून, वेगाने पाण्याचा निचरा होण्याची मैदानाची क्षमता आहे. पुनर्विकसित सुविधेत आधुनिक वाळू-आधारित आउटफिल्ड आहे. कुठल्याही मोसमात या मैदानाचा उपयोग केला जाऊ शकतो. यासाठी माजी  क्रिकेटपटू अबे कुरुविला आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( बीसीसीआय) क्युरेटर प्रकाश आढाव यांनी मार्गदर्शन केले, तर हृषीकेश कानिटकर आणि आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड यांनीही मोलाच्या सूचना दिल्या.


याप्रसंगी बोलताना पूना क्लबचे अध्यक्ष गौरव गढोक म्हणाले, “आजचा दिवस पूना क्लबसाठी अभिमानाचा आणि निर्णायक क्षण आहे. हे मैदान केवळ पायाभूत सुविधांची सुधारणा नाही, तर ते क्रिकेटच्या भावनेबद्दल आणि भविष्याबद्दल असलेल्या आमच्या वचनबद्धतेची पुष्टी आहे. दिग्गजांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या सदस्यांच्या पाठिंब्याने, आम्ही परंपरा आणि आधुनिक उत्कृष्टता यांचा मेळ घालणारी सुविधा निर्माण केली आहे. कपिलदेव आणि चंदू बोर्डे यांच्यासारख्या दिग्गजांच्या उपस्थितीमुळे हा प्रसंग खरोखरच विशेष बनला आहे. त्यांची उपस्थिती या मैदानावर खेळणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील.”


माजी कर्णधार कपिलदेव म्हणाले, “पूना क्लब खेळासाठी दर्जेदार पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करत असल्याचे पाहून आनंद वाटतो. अशा उत्तम सुविधांमधूनच भविष्यातील क्रिकेटपटू घडतात. क्लबच्या उत्कृष्टतेप्रती असलेली वचनबद्धता आणि खेळाची भावना जपणे, या गोष्टीने मी सर्वाधिक प्रभावित झालो आहे. यासारखी मैदाने तरुण खेळाडूंना मोठी स्वप्ने पाहण्यास आणि अधिक चांगले खेळण्यास प्रेरित करतात.” माजी कसोटीपटू चंदू बोर्डे म्हणाले, “ पूना क्लबला नेहमीच समृद्ध क्रिकेट संस्कृती लाभली आहे आणि हा वारसा इतक्या सुंदर पद्धतीने पुढे नेला जात असल्याचे पाहून समाधान वाटते. मला आशा आहे की हे मैदान प्रतिभा जोपासत राहील आणि खेळाची खरी मूल्ये जपेल.”

हा प्रकल्प यशस्वी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे सदस्य तुषार आसवानी, माजी अध्यक्ष सुनील हांडा, विक्रम दामले, ऋषी चैनानी, तारिक परवानी, उमेश पिल्ले यांचे क्लबने आभार मानले आहेत. क्लबने माजी अध्यक्ष राहुल ढोले पाटील यांच्या दीर्घकालीन समर्पणाबद्दल आणि पॅव्हेलियन नामकरण उपक्रमाला पाठिंबा दिल्याबद्दल दिलीप संघवी यांच्या योगदानाचीही दखल घेतली. सदस्य, कर्मचारी, ग्राउंड्समन आणि भागीदार यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हा प्रकल्प शक्य झाला, अशी कृतज्ञता अध्यक्षांनी व्यक्त केली.

….
पूना क्लबशी माझे जुने ऋनानुबंध आहे. या निमित्ताने माझ्या जुन्या आठवणींनाही उजाळा मिळाला आहे. पूर्वीच्या क्लबवर आम्ही खेळलो आहोत. आता क्लब पूर्णपणे बदलले आहे. येथे भारतीय संघाचे सराव शिबिरही झाले होते. त्या वेळी मैदान जागतिक दर्जाचे नव्हते. त्यामुळे आमच्यातील अनेकांना दुखापती व्हायच्या. आता वाळू-मिश्रीत मैदान असल्याने दुखापती कमी होतील. पूना क्लबने आधीच क्रिकेटला खूप काही दिले आहे. त्यात एका नव्या मैदानाची भर पडली आहे.
– कपिलदेव, भारताचे माजी कर्णधार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *