हर्षदा अभिजीत फरांदे यांची भाजप महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी निवड

Spread the love

पुणे : प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी  हर्षदा अभिजीत फरांदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानले.

हर्षदा फरांदे म्हणाल्या, “पक्ष संघटनेने माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने काम करेन. संघटनेला अधिक बळकटी देण्याची संधी मी निश्चितच आत्मसात करेन. महिला मोर्चाचे जाळे राज्यभर अधिक सक्षम करण्यासाठी आणि पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी वेळोवेळी प्रयत्नशील राहीन.”

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माझ्यावर जाबबदारी सोपवून दाखवलेल्या विश्वासास निश्चित पात्र ठरू असा विश्वास हर्षदा फरांदे यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *