जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनिवासी भारतीय सेलच्या वतीने पद नियुक्ती पत्र वाटप व चर्चासत्र कार्यक्रम संपन्न.

Spread the love

 

8 मार्च “अंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त” महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनिवासी भारतीय (NRI) विभाग द्वारा पुणे जिल्हा व महाराष्ट्र राज्य पातळीवर महिला सेलचे पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र वाटपाचा कार्यक्रम हॉटेल रविराज भांडारकर रोड डेक्कन पुणे येथे आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवनिर्वाचित नगरसेवक व स्थायी समिती सदस्य, माजी महापौर प्रशांत जगताप ह्यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. या वेळी अनिवासी भारतीय विभागाच्या अध्यक्षा विद्या कदम, कार्याध्यक्ष व प्रभारी डॉ, मॅन्युअल डिसूझा व उपाध्यक्ष ॲड, धनंजय बुद्धिवंत यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाले.
राज्य महिला अध्यक्ष सुवर्णा माने,
राज्य महिला उपाध्यक्ष ॲड, रेखा माने,
राज्य महिला सचिव मेघा शेगर,
पुणे जिल्हा महिला अध्यक्ष मुमताज शेख
यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी सेक्रेटरी राष्ट्रपती पदक सम्मानित निवृत्त पोलीस निरीक्षक आनंद जंगम, वरिष्ठ उपाध्यक्ष निक्सन ऑगस्टीन, उपाध्यक्ष केनेत रेमी,अर्चना शहा, उपाध्यक्षा अलिशा बुद्धिवंत, जनरल सेक्रेटरी मिस सोनिया आगा, खजिनदार सौ विनीता जाधव, जॅकलीन फाॅरेस्टर, मनिषा ढवले, बळीराम चव्हाण, सौ मन्दाकिनी खरात, अनिल कस्बे, कवी बाळासाहेब जाधव, पत्रकार शंकर जोग व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी विद्या कदम म्हणाल्या अनिवासी भारतीय नागरिक शिक्षण नोकरी किंवा व्यवसायासाठी भारताबाहेर राहतात त्यांच्या रक्षणासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी एनआरआय अनिवासी भारतीय बाहेर देशात राहणारे त्यांना काँग्रेस पक्षात जोडणे त्यांच्या अडीअडचणी व समस्यांचे समाधान करणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *