वारकर्‍यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आषाढी एकादशीला पंढरपूर येथे ‘भव्य वारकरी महाअधिवेशन’ !

Spread the love

वारकरी संतांना ‘घुसखोर’ म्हणून हिणवणार्‍यांचा जाहीर निषेध अन् हिंदुत्वनिष्ठ संतांचा अधिवेशनात भव्य सन्मान ! – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

     सोलापूर – वारकरी संप्रदाय गेली अनेक शतके समाजाला नैतिक मूल्येसंस्कृतीरक्षण आणि देशभक्तीची शिकवण देत आहेआजही हा संप्रदाय धर्म आणि राष्ट्रहितासाठी अविरत कार्यरत आहेयाच भूमिकेतून वारकरी ऐक्य साधण्यासाठी आणि शासनाकडे महत्त्वपूर्ण मागण्या लावून धरण्यासाठी आषाढी एकादशीच्या (२५ जुलैपावन पर्वावर पंढरपूर येथे एक दिवसीय भव्य ‘वारकरी महाअधिवेशन’ आयोजित करण्यात आले आहेपंढरपूरआळंदी येथे वर्ष २००८ पासून अशा प्रकारची अधिवेशन चालू असून या महाअधिवेशनात हिंदुत्वासाठी कार्य करणार्‍या ह..आणि पूजनीय संतांना ‘घुसखोर’ संबोधून त्यांचा अवमान करणार्‍या तथाकथित पुरोगाम्यांचा जाहीर निषेध करण्यात येईलतसेचधर्मरक्षणासाठी झटणार्‍या हिंदुत्वनिष्ठ संतांचा या वेळी जाहीर सन्मान करण्यात येणार आहेअसे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्य संघटक श्रीसुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत केलेया वेळी राष्ट्रीय वारकरी परिषदेचे अध्यक्ष ह..मारुती महाराज तुनतुने (शास्त्री), राष्ट्रीय प्रवक्ता ह..निवृत्ती महाराज हल्ल्याळीकरप्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्कलकोटचे पीठासीन धर्माधिकारी श्रीप्रसाद पंडित आणि हिंदु जनजागृती समितीचे श्रीदत्तात्रय पिसे आदी उपस्थित होते.

     हे महाअधिवेशन दिनांक २५ जुलै २०२६ (आषाढी एकादशीदुपारी १२.३० ते ३.३० या वेळेत पंढरपूर येथील भक्तीमार्गजनकल्याण हॉस्पिटलच्या शेजारी असलेल्या सद्गुरु श्री गंगागिरी महाराज मठात पार पडेलया अधिवेशनाचे अध्यक्षस्थान आचार्य पूज्यपाद श्री १००८ दंडी स्वामी अमृताश्रम महाराज भूषवणार असूनसरला बेटश्री क्षेत्र गोदावरी धामचे पीठाधीश महंत गुरुवर्य प.पूरामगिरी महाराज यांचे मार्गदर्शन या अधिवेशनाला लाभणार आहे.

         या अधिवेशनात ज्येष्ठ कीर्तनकार संतवीर ह..बंडातात्या कराडकरमहाराष्ट्र वारकरी महामंडळाचे अध्यक्ष ह..रामेश्वरशास्त्री महाराज आणि सचिव ह..नरहरी महाराज चौधरीश्री विठ्ठलरुक्मिणी संस्थानचे (पंढरपूरविश्वस्त ह..प्रकाश महाराज जवंजाळजगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त ह..माणिक महाराज मोरेश्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान (आळंदीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथअखिल भारतीय संत समितीचे प्रदेश महामंत्री स्वामी भारतानंद सरस्वती महाराज मार्गदर्शन करतीलतसेचशिवसेना आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष श्रीअक्षय महाराज भोसलेभाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशप्रमुख श्रीतुषार भोसलेराष्ट्रीय वारकरी परिषदेचे ह..मारुती महाराज तुनतुने..बापू महाराज रावकर..निवृत्ती महाराज हल्ल्याळीकर आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्य संघटक श्रीसुनील घनवट यांसह अनेक मान्यवर संतमहंतधर्माचार्य आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रमुखही आपले विचार मांडणार आहेत.

           या अधिवेशनात वारकर्‍यांच्या जिव्हाळ्याच्या प्रमुख मागण्यांवर सविस्तर चर्चा केली जाईलपंढरपूरदेहूआळंदीपैठणमुक्ताईनगर यांसह सर्व तीर्थक्षेत्रे कायमस्वरूपी मद्य आणि मांसमुक्त करावीत तसेच या तीर्थक्षेत्रांच्या 10 किलोमीटर परिसरात अहिंदूंच्या धर्मप्रसारावर सक्त बंदी आणावीही प्रमुख मागणी असेलयाशिवायसंतवाङ्मयराष्ट्रपुरुषधर्म आणि देवतांचा अवमान करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र ’ईशनिंदा प्रतिबंधक कायदा’ लागू करावा आणि संतांच्या श्लोकांचा चुकीचा अर्थ लावून वारीचे वातावरण कलुषित करणार्‍यांना शासनाने कायमचा प्रतिबंध करावानक्षलवाद्यांचे समर्थन करणार्‍या ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’सारख्या संघटनांना तसेच नास्तिक अन् पुरोगाम्यांना वारीत येण्यास प्रतिबंध करावा आणि ‘अंनिस’च्या आर्थिक घोटाळ्याच्या चौकशीसाठी तात्काळ प्रशासक नेमावावारकरी शिक्षण संस्था आणि वेद पाठशाळांना मासिक अनुदान द्यावेचंद्रभागा व इंद्रायणी नद्यांचे प्रदूषण त्वरित रोखावे आणि ‘वक्फ बोर्डा’ने हडपलेल्या मंदिरांच्या जमिनी परत मिळवण्यासाठी शासनाने त्वरित निर्देश द्यावेतअशा महत्त्वपूर्ण मागण्या या वेळी शासनाकडे केल्या जातील.

         तसेचपुरातत्त्व विभागाच्या श्री विठ्ठलरुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनाच्या धर्मविरोधी निर्णयाविरुद्ध वारकरी अन् मंदिर महासंघ यांनी दिलेल्या लढ्याबाबत या महाअधिवेशनात चर्चा केली जाईलप्रस्तावित ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम २०२६’ कायमस्वरूपी रद्द करून देवभूमीचे रक्षण करणारा ‘अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट’ लागू झाला पाहिजेअसा महत्त्वाचा ठरावही मांडण्यात येईलसमस्त वारकरी आणि भाविकांनी या ऐतिहासिक अधिवेशनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावेअसे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले असून अधिक माहितीसाठी श्रीविनोद रसाळ (संपर्क९९७५५९२८९२यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *